आमच्या विषयी

दूरसंचार सेवेच्या गुणवत्तेत सुधारणा दूरसंचार नेटवर्कचा विस्तार करून व नवीन सेवा सुरु करण्यासाठी व भारताची राजकीय राजधानी दिल्ली व व्यावसायिक राजधानी मुंबई या दोन महानगरामध्ये दूरसंचार सेवा पूरवण्यासाठी व त्यापासून मिळणारे उत्पन्न वाढविण्यासाठी दि. १ एप्रिल १९८६ रोजी एमटीएनएलची स्थापना केली.   

आम्ही स्वांतत्र्य प्राप्ती नंतर वर्ष १९८२ मध्ये बॉम्बे टेलिफोन एक्सचेंजची स्थापना करुन आमच्या व्यवसायास सुरुवात केली तेव्हापासून या क्षेत्रात आम्ही अग्रणी आहोत.   

पूर्वीची जी बॉम्बे तिला आता मुंबई या नावाने ओळखले जाते.  परिस्थितिनुरुप संचार सेवेच्या पध्दती मध्ये पण बदल होत गेला.  आम्ही सदैव नवीन सेवा सुरु केली आहे.  यामध्ये एकदम स्पष्ट आवाजाची लँडलाईन असेल, एडीएसएलच्या माध्यमातून उच्च गतिची ब्रॉडबँड सेवा आदीचा समावेश आहे.  जेव्हा इतर प्रचालक या सेवेसाठी ज्यादा किंमत घेऊन सेवा पुरवत होते तेव्हा आम्ही सर्वांना परवडेल अशी मोबाईल सेवेची सुरुवात केली.  आम्ही भारतामध्ये व मुंबईमध्ये ३जी सेवेची सुरुवात केली.  आम्ही व्हीओआयपी व आयपीटीव्ही सेवेची सुरुवात करण्यामध्ये अग्रभागी आहोत.    

आर्थिक राजधानी मध्ये अधिकतर सार्वजनिक उपक्रमानी एमटीएनएलला संपूर्ण सेवा पुरवणारा उपक्रम म्हणून अधिक पसंती दर्शवली आहे.  आम्ही मुंबई मध्ये ४५ लाख लोकांना दूरसंचार सेवा देऊन त्यांची गरज पूर्ण करतो.   

आम्ही, एमटीएनएल कंपनी कधीही यश मिळाल्वायावर कोठेही थांबत नाही.  निरंतर कमी दरांमध्लेये आपणास सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहोत.  आपणास जर अशीच सुधारीत दूरसंचार सेवा हवी असेल तर आपण संपूर्ण  दूरसंचर सेवा देणा-या एमटीएनएलच्या सेवेवर पूर्णत: विश्वास ठेवा.  

 

 

 

उल्लेखनीय व ठळक कार्ये

महत्वपूर्ण विकासक्रम

वर्षविवरण
२८-०१-१८८२ मुंबई टेलीफोन कंपनी कडून फोर्ट मध्ये लॉज कॉल वायर उपकरणाचा अधिकृत उपयोग करुन मुंबई मध्ये पहिले टेलिफोन एक्सचेंज सुरु केले. 
१८९२-१८९३ सर्व एक्सचेंजना मॅग्नेट एक्सचेंज मध्ये परिवर्तित केले. 
१८९६ मुंबईमध्ये फोनोग्रामची सुरुवात केली.
१९०६-१९१० जमीनीखाली खोलवर केबल टाकण्यास सुरवात केली.
२४-०५-१९२४ भारतात सर्व प्रथम ऑटो एक्सचेंजची सुरुवात केली. 
१९३२ डिस्क रिकार्ड बरोबर स्वयंचलित वेळेची घोषणा करणारा मशीन स्थापन केली.  
१९४१ मीटर प्रमाणे भाडे घेण्यास सुरवात केली.  
अप्रैल, १९४३ २१००० लाईन सहीत मुंबई टेलिफोन कंपनीस भारत सरकार ने स्वीकारले.   
१९५०-१९५५ हळू हळू स्ट्राउजर एक्सचेंजची सुरवात केली.   
१९५६-१९६० सेंट्रल डिस्क टेप रिकार्डर प्रकारच्या घोषणेस प्रारंभ केला.   
१९६६-१९७० मुंबई मध्ये प्रथम पेन्टा कोन्टा, क्रास बार एक्सचेंजची स्थापना केली.  
१९७१-१९७५ दिनांक ६-८-१९७५ रोजी एसटीडी बरोबर वन मॅक्स२ एक्सचेंज वाशी, नवी मुंबई करीता सुरु केले.    
वाशी डिमांड ट्रंक सेवा सुरु केली.    
बीजी, सीए व बीआरडी करीता डिमांड ट्रंक सुरु केली.    
संगणीकृत टेलिफोन लेखा शस्त्रांड ट्रंक सुरु केली.    
इन टेलेक्स सेवेची सुरुवात केली. 
१९७५ सीटी व अंधेरी दोन ठिकाणामध्ये प्रथम पीसीए सिस्टमची सुरुवात केली.  
१९७६-१९७८ वेगवेगळया स्टेशनसाठी एसटीडी व लंडन या देशासाठी आयएसडी सेवा सुरु केली.  
१९७८-१९७९ दिनांक २६-०६-१९७८ रोजी मलबार हिल मध्ये ४०० हिटाची क्रॉसबार सुरु केले. 
१९८३-१९८४ कूपरेज मध्ये एसपीसी ऍनालॉग सुरु केले.  
१९८५-१९८६ वरळी ३ द‌क्षिण कुलाबा, वडाळा २, मध्य व घाटकोपर २ मध्ये ई-१० बी एक्सचेंज सुरु केले. व यूएमएस व काही युरोपियन देशांकरीता आयएसडी सुरु केली.   पनवेल तलोजा नाव्हा सेवा व उरण ही क्षेत्र अधिकार महाराष्ट्र परिमंडल क्षेत्रात सुरु केली.  
१९८६-१९८७ १-४-८६ रोजी एमटीएनएल ची स्थापना केली.
१९८७-१९८८ पूर्ण बटनसहीत उपकरण अधिक प्रमाणात उपलब्ध केली गेली.
१९८८-१९८९ इलेक्ट्रानिक एक्सचेंजशी संबंधीत ग्राहकांना नंबरची फोन प्लस सेवा उपलब्ध केली गेली.  
१९९१ आय-नेट सेवा सुरु केली.    
१९९२-१९९३ फउंटन मध्ये ३ व ठाणे आरएलसी १ मध्ये फैटैक्स १५० सुरु केले व प्रभादेवी व्होईस मेल व रेडीयो पेजिंग सेवा सुरु केली.   १९७ सेवा नॉनमीटर केली गेली.   
१९९३-१९९४ कांदीवली मध्ये पहीला ओसीबी स्वीच सुरु केला.  
१९९४-१९९५ विलेपार्ले व बोरिवली मध्ये पहिले ईडब्ल्यूएसडी एक्सचेंज सुरु केले.
१९९५-१९९६ स्वयंचलित नंबर उदघोषणाचा वापर व इंटरएक्टिव दोष सुधार सेवा सुरु केली गेली.  
१९९६-१९९७ आयएसडीएन सेवेचा उपयोग व्यवसायिक रुपाने करण्यास सुरुवात केली व ऑटोकॉम सेवा सुरु केली गेली.  
१९९७-१९९८ नवीन कनेक्शनसाठी असणारी प्रतिक्षा यादी समाप्त केली.  या मध्ये एकूण २१४७५ कनेक्शनचा समावेश केला गेला. 
१९९८-१९९९ आयएन इंटेलिजेंट नेटवर्क सेवा व  इंटरनेट सेवा सुरु केली व त्यामुळे एमटीएनएल एक आयएसपी बनले. 
१९९९-२००० एमटीएनएल, मुंबई ने २ मिलीयन ग्राहक संख्याचे लक्ष्य प्राप्त केले.   एमटीएनएल मध्ये १००% इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
२०००-२००१ दि. २७ फेब्रुवारी, २००१ रोजी एमटीएनएल ने स्वत:ची डॉल्फीन नामक जीएसएम वर आधारीत सेवा सुरु केली.   
२००१-२००२ ब्रॅंड  ''ट्रम्प''  नामक जीएसएम की प्रीपेड सेल्युलर मोबाईल सेवा सुरु केली.  
२००४-२००५ उच्च गति इंटरनेट ब्रॉडबॅंड सेवा सुरु केली. 
२००५-२००६ सीडीएमए २००० १X नवीन एक्सचेंजजी स्थापना करुन प्रीपेड गरुड मोबाईल सेवा सुरु केली.  ब्रॉड बॅंड वर गेम ऑन डिमांड व आयपीटीव्ही सेवा सुरु केली.  
२००६-२००७

व्हीओआयपी सेवा प्रारंभ केली.

२००८-२००९ जीएसएम मोबाईल सेवेमध्ये एनजीएन स्विच ३जी तंत्रज्ञानाची सुरुवात केली.  
२००८-२००९

व्हीडीएसएल सेवा सुरु केली  (अति उच्च गति डिजिटल ग्राहक लाईन)  

२०१०-२०११ २७.०९.२०१० ला जीएसएम प्रणाली मध्ये सीबीसीआरएम