व्यत्यय  आणू नये / कॉल करु नये (डू नॉट डिस्टर्ब - डीएनडी)  
दूरसंचार वाणिज्यिक ग्राहक संचार सेवा पसंती
 
वाणिज्यिक व्यापाराविषयी ग्राहकाशी संवाद साधताना , ग्राहकाचे खासगीपण जपण्याचा एमटीएनएल विशेष प्रयत्न करते. या सेवेमध्ये आपल्या पसंतीचे वाणिज्यिक संबंधी माहिती प्राप्त करण्याचे  विकल्प उपलबध आहेत.  
आपण  राष्ट्रीय ग्राहक पसंत रजिस्टर मध्ये आपल्या नंबरची नोंदणी केल्यास आपणास टेलिमार्केटींग कंपनीकडून  येणारे  अनावश्यक कॉल्स व संदेश (एसएमएस) येणे बंद होईल.
पसंतीनुसार नोंदणी/पसंतीमध्ये बदल करणे/नोंदणी रद्द करणे
  
पसंतीनुसार नोंदणी/पसंतीमध्ये बदल करणे/नोंदणी रद्द करणे

 

व्होंईस कॉलच्या माध्यमातून

आपण खालील श्रेणीमधून संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या पसंतीनुसार नोंदणी करु शकता.  :
• पूर्णप्रकारे बंद श्रेणी  
(कोणताही टेलिमार्केटींग कॉल किंवा संदेश मिळणार नाही.) 
•  काही प्रमाणात येणारे कॉल / संदेश बंद करणारी श्रेणी                                  
यामध्ये  आपणास खालील विकल्पातून आवश्यक विकल्प निवडता येतील.
विकल्प:
1. बैंकिग / विमा / वित्तिय उत्पादने / क्रेडिट कार्ड 
2. रियल इस्टेट 
3. शिक्षण 
4. आरोग्य 
5. ग्राहकोपयोगी  वस्तू व  ओटोमोबाइल्स 
6. दळणवळण संचार / प्रसारण / मनोरंजन / माहिती तंत्रज्ञान  
7. पर्यटन व विश्रामगृह
आपल्या पसंतीनुसार नोंदणी करण्यासाठी / पसंती बदलण्यासाठी /  नोंदणी रद्द करण्यासाठी १९०९ वर कॉल करा .
संदेशाच्या (एसएमएसच्या) माध्यमातून
• आपल्या पसंतीनुसार नोंदणी करण्यासाठी ,"START‹option(s)› " हा एसएमएस   १९०९ वर पाठवा. उदहारणर्थ 'Real State' च्या विकल्पासाठी  पुढीलप्रमाणे "START 2"  असे टाईप करुन १९०९ वर एसएमएस पाठवा.
• पसंतीमध्ये बदल करण्यासाठी,  दिलेल्या विकल्पांना रद्द करण्यासाठी  “STOP‹option(s)›"  असा एसएमएस व नवीन विकल्प घेण्यासाठी “START‹option(s)›” असा एसएमएस १९०९ वर पाठवा. 
• नोंदणी रद्द  करण्यासाठी  “STOP”  असा एसएमएस  १९०९ वर पाठवा. 
• ग्राहक एकाच वेळी अनेक विकल्प निवडू शकतात. उदहारणार्थ विकल्प 'शिक्षण'  व  'आरोग्य'  कडून आपणास एसएमएस हवा असेल तर “START 3,4”  असा एसएमएस १९०९ वर पाठवा.
• वाणिज्यिक व्यापारासेवा विषयी एसएमएस पूर्णपणे बंद करण्यासाठी “START 0 ”    असा एसएमएस १९०९ वर पाठवा.
 

 

 

 

 तक्रार नोंदणी 
 
तुम्ही आपला टेलिफोन एनसीपीआर मध्ये नोंदणी केल्यावर ,  ७ दिवसानंतरही जर आपणास अनावश्यक व्यापारीक माहिती / संदेश प्राप्त होत असतील तर तुम्ही खालील प्रकारे  तक्रार करु शकता.
  • टोल फ्री नंबर १९०९  डायल करा;
  • या १९०९ वर एसएमएस पाठवा. 
    •  एसएमएस खाली  प्रमाणे करावा. 
       “COMP TEL NO XXXXXXXXXX, dd/mm/yy, Time hh:mm” 
       येथे XXXXXXXXXX  म्हणजे  आपणास प्राप्त होणा-या अनावश्यक टेलिफोन/एसएमएसचा क्रमांक  दर्शवितो. 
       आपल्या तक्रारीची नोंद करून त्याची स्वीकृती म्हणून एमटीएनएल द्वारा  एसएमएस   पाठवला जाईल.
कृपया लक्षात ठेवा  :
• ज्या टेलिफोन नंबरवरती तुम्हाला  अनावश्यक व्यापार विषयक माहिती दिली जाते त्या टेलिफोन वरुनच  आपण आपली तक्रार नोंदवणे  आवश्यक आहे. 
•  अनावश्यक व्यापारविषयक माहिती उपलब्ध झाल्यावर ३ दिवसाच्या आत आपण त्याची तक्रार नोंद करणे आवश्यक आहे. 
 
  अधिक माहितीसाठी  ट्रायच्या टेलिकॉम वाणिज्यिक संचार पसंद पोर्टल वर  क्लिक करा