अकाऊंट कॉलिंग सेवा कार्ड


या सेवेमध्ये ग्राहक एमटीएनएल (मुंबई व दिल्ली) मधिल नेटवर्कमध्ये कोणत्याही एसटीडी सेवा रहित फोनवरुन कोठेही स्थानिक, देशी आंतरराष्ट्रीय फोन कॉल करु शकतात.


या सेवेची वैशिष्ट्ये व सुविधा

अकाऊंट कार्ड कॉलिंग सेवा ही एक्सेस कोड १६०४२२ वर आधारित सेवा आहे.  ग्राहकांनी एक्सेस कोड डायल केल्यानंतर ग्राहकांस अकाऊंट कार्ड क्रमांकावर असणा-या पिन नंबर प्रविष्ठी(Enter PIN No.) करावी.  उपयोगकर्ता वैधते साठी अकाऊंट कार्ड क्रमांक  व पिन क्रमांक डायल करेल व या नंबरावरुन ग्राहकांची ओळख प्रामाणिकतेची तपासणी झाल्यावर ग्राहकांनी गंतव्य क्रमांक डायल करावा.  जर उपयोगकर्त्याच्या कार्ड अकाऊंट मध्ये पैसे शिल्लक असतील तरच ग्राहक कॉल करु शकेल.

डायल करण्याची पद्धत

डायल एक्सेस कोड -  प्रथम १६०४२२ डायल करावा नंतर ८ अंकीय कोड क्रमांक नंतर ४ अंकीय पिन क्रमांक नंतर आपण ज्या नंबर वर फोन करणार आहात तो क्रमांक डायल करावा.

डायलींग प्लान -  १६०४२२ xxxxxxxx-yyyy-zzzzzzzz

एक्सेस कोड - १६०४२२

कार्ड क्रमांक  -    xxxxxxxx      (८ अंकीय)

पिन क्रमांक  -     yyyy             ( ४ अंकीय)

गंतव्य क्रमांक  - zzzzzzzzzz   (२० अंकापेक्षा अधिक)

महत्वपूर्ण सूचना -

           व्हीसीसी महत्वपूर्ण माहितीचा उल्लेख करावा.  येथे क्लिक करा

ग्राहकांस मिळणारा फायदा

  • स्वत:जवळ फोन कनेक्शन असणे आवश्यक नाही 
  • कोणत्याही टोन फोन वरुन कॉल केला जाऊ शकतो.
  • कॉल करण्यासाठी रोख रक्कम घेऊन जाण्याची आवश्यकता नाही. 
  • या सेवेचा उपयोग करुन एक किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींना टेलिफोन केल्यानंतर, होणारा अंदाजे खर्च व खात्यावर शिल्लक असणारी रक्कम आपण पाहू शकता. 
  • या मध्ये कोणत्याही फोन वरुन एसटीडी/आयएसडी क्रमांक डायल करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
  • हॉटेलमधून केल्या जाणा-या फोनच्या कॉल दरा पेक्षा या सेवेचे दर फार कमी आहेत म्हणून ही सेवा व्यवसाय करणा-या व्यक्ती प्रबंधन कार्य करणा-या व्यक्तीसाठी फार उपयोगी आहे. 
  • आपला खाते नंबर समान राहील व आपण आपल्या इच्छेनुसार प्रमाणित कोड बदलू शकता. ( फक्त एसीसी साठी)   
  • आपण केलेल्या स्थानिक/एसटीडी/आएसडी कॉलच्या बिलाचे रेकॉर्ड उपलब्ध असेल. 
  • सुरक्षा ठेव परत घेता येते.                                                                                                        {tab=मूल्य |teal}

  कार्ड धारकाच्या खात्यामधून फक्त कॉलचे मूल्य घेतले जाईल.  ज्या लाईनवरुन कॉल केला असेल त्या लाईनचा व ज्या लाईन वर कॉल केला आहे त्याचा आपसामध्ये काही संबंध नाही.  अकाऊंट कार्डसाठी कोणत्याही प्रकारचे बिल बनवले जाणार नाही.           

आवेदन करण्यासाठी संपर्क

तक्रार करण्यासाठी टोल फ्री  नं. : १८०० २२ १५०० डायल करा.

 

तांत्रिक माहितीसाठी

 

संपर्क नंबर:१९०१-२२-६७८९  / उप प्रबंधक  (आयएन) - २४३२७००२ / २४३८२४८६

तक्रार करण्यासाठी  नि:शुल्क क्रमांक १८०० २२१५००  डॉयल करा.

पीएस : वर्तमान मूल्यानुसार सेवेचे दर सांगितले आहेत.   कोणत्याही प्रकारची सूचना न देता या दरामध्ये बदल केला जाऊ शकतो. 

​