देयक (बिल) भरण्याकरीता पर्याय 


एमटीएनएल आपल्या ग्राहकांकरीता देयक (बिल) भरण्याच्या पर्यायांची एक विस्तृत श्रृंखला उपलब्ध करुन देत आहे.  आता बिल भरण्याकरीता लांबलचक रांगेची चिंता नाही.  खालील दिलेल्या पर्यायांतुन एकाची निवड करा व सहजपणे आपल्या एमटीएनएल देयकाचा भरणा करा. 

ऑनलाइन भरणा

तुम्ही तुमच्या बिलाचा भरणा, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगच्या सहाय्याने आमच्या वेबसाईट http://mtnlmumbai.in वर जाऊन व print/pay your bill icon  अथवा "self care" आयकॉन वर क्लिक करुन करु शकता.

तुम्ही बिल डेस्क किंवा बिल जंक्शन वर नोंदणी करुन ही भरणा करु शकता. 

आयव्हीआरएस आधारित भरणा

आता तुमचे लँडलाईनचे देयक (बिल) भरणे अधिक सोयीचे---

तुम्ही एमटीएनएल लँडलाईन किंवा मोबाईल नंबर १२९६ (टोल फ्री) डायल करा व आयव्हीआरएसचे पालन करा. 

त्याहून अधिक,  आता १२९६ वर देयक (बिल) भरणा करुन आपल्या देयकाच्या राशी वर १% ची सूट मिळवा (अधिकतम सूट रु. २५०)

तुमचा लँडलाईन क्रमांक  व ग्राहक क्रमांक द्या.  

लँडलाईन क्रमांक  व ग्राहक क्रमांक नक्की केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शेवटच्या डेक राशीची माहिती दिली जाईल

आपल्या क्रेडिट कार्ड द्वारा भरणा केल्यानंतर तुमचा ट्रान्झॅक्शन क्रमांक भविष्यात उपयोग करण्याकरीता लक्षात ठेवा.

नोट - निश्चित तारखेनंतर, आयव्हीआरएस पध्दतीने देयक (बिल) भरणा होऊ शकणार नाही.

क्रिया - १२९६ डायल करा -- भाषेची निवड करा -- तुमचा लँडलाईन क्रमांक व ग्राहक क्रमांक द्या --- देयकाच्या (बिलाच्या) संबंधात माहीती ऐका --- तुमच्या क्रेडिट कार्ड ने देयक (बिल) भरणा करा---- तुमच्या व्यवहाराचा (ट्रानझॅक्शन) क्रमांकाची नोंद घ्या॰

 

एमटीएनएल काऊंटर्स

सर्व उपनगरीय रेल्वे स्थानक व महत्वपूर्ण स्थळी असलेल्या व तुमच्या सोईनुसार निवडलेल्या स्टँडर्ड चार्टड, आयसीआयसीआय व देयक (बिल) ड्रॉप बॉक्स मध्ये तुम्ही तुमचे चेक काऊंटर फाईल बरोबर टाकू शकता.

एमटीएनएल ड्रॉप बॉक्स

Simply Drop your cheque along with counter foil of the bill into select Standard Chartered, ICICI and Bill Box drop boxes which are conveniently located at all suburban railway stations and important places.

बँक कनेक्शन सेंटर

Pay at select branches of

  •               स्टेट बँक ऑफ इंडीया
    •  यूनियन बँक ऑफ इंडिया व
    •  सेंट्रल बँक ऑफ इंडिया

ईसीएस

तुम्ही ईसीएस आदेश फॉर्म भरुन टेलिफोन देयक (बिल) भरणा करण्याच्या कटकटीतून सुटकारा मिळवा.

तुमच्या बँकेकडून आपोआप तुमच्या देयकाचा भरणा करता येईल. बँकेला देयक (बिल) भरणा करण्याकरीता अधिकृत करण्यासाठी एमटीएनएल ग्राहक सेवा केंद्रावर ईसीएस मँडेट फॉर्म प्रस्तुत करणे आवश्यक आहे.  देयकाच्या निश्चित तारखेपासून २९ दिवसानंतर बँकेकडून तुमच्या खात्यातील जमा राशीमधून देयकाची रक्कम काढली जाईल.  तुम्ही जमाराशीतून काढण्यात येणा-या रकमेची कमाल मर्यादा निश्चित करु शकता.  या पर्यायाच्या माध्यमातून देयक (बिल) भरणा केल्यानंतर तुम्हाला १ %ची सूट,  जास्तीत जास्त २५०/- रु. पर्यंत दिली जाईल

ऐच्छिक जमा योजना

तुम्ही, देयकाच्या रक्कमेचा भरणा आगाऊ जमा राशीच्या रुपात ६ महीने किंवा १ वर्षाकरीता करु शकता व त्यावर व्याज मिळवू शकता.  जमा राशी मधून मासिक देयकाची (बिलांची) रक्कम वळती केली जाईल.

एटीएम भरणा

तुम्ही, देयक भरणा करण्याकरीता शहराच्या वेगवेगळ्या भागात असलेल्या कोणत्याही एक्सीस बँकेच्या एटीएमची निवड करु शकता.

सीटीओ / डीटीओ

तुम्ही, १७ सेंट्रल टेलिग्राफ ऑफिस / विभागीय टेलिग्राफ ऑफीस मध्ये देयक  भरणा करा.

सोपे देयक (बिल) आऊटलेट्स

तुम्ही, देयक (बिल) भरणा करण्याकरीता Easy Bill or pay point outlets ची निवड करा.

​