ब्रॉडबैंड चे वारंवार विचारले जाणारे प्रश्न  {एफ ए क्यू}

तंत्रज्ञान विषयक{टेक्निकल}

ब्रॉडबँड कनेक्शनकरीता विद्यमान {एक्झिस्टिंग} मॉडेमचा उपयोग केला जाऊ शकतो कां ?

इंटरनेट करीता वापरले जाणारे बहुतांश मॉडेम डायल अप असतात.  परंतु ते ब्रॉडबँड कनेक्शनसाठी उपयुक्त नाहीत.  ब्रॉडबँड कनेक्शनकरीता विशिष्ट एडीएसएल मॉडेमची आवश्यकता असते.  एमटीएनएलकडून हे मॉडेम दिले जाते व बाजारातूनही खरेदी केले जाऊ शकते.  एमटीएनएलच्या संकेत स्थळावर संबंधित उपयुक्त मॉडेमची सूची उपलब्ध आहे.

एडीएसएल मॉडेम कनेक्ट करण्यासाठी संगणकामध्ये {कंप्युटर} कोणत्या प्रकारच्या पोर्टची आवश्यकता असते ?

संगणकासोबतच्या जोडणी करीता एडीएसएल मॉडेम मध्ये इथरनेट पोर्ट किंवा युएसबी पोर्ट उपलब्ध असते.  यातील एकाचा उपयोग कनेक्शनसाठी करता येतो.  ब्रॉडबँड कनेक्शनच्या नोंदणीपूर्वी यातील कोणत्याही एका पोर्टच्या उपलब्धतेची खात्री करुन घ्यावी॰  

ब्रॉडबँड कनेक्शनचा उपयोग करतांसाठी कोणत्या संगणक प्रणालीची {कंप्युटर सिस्टिम} आवश्यकता असते ?

  • ऑपरेटींग सिस्टीम विंडोज ९८ एसई व त्याहून उच्च दर्जाची    अनुकूल पीसी हार्डवेअर   रॅम १२८ व त्याहून अधिक वेगवान    एडीएसएल मॉडेम/ राऊटरकरीता युएसबी पोर्ट किंवा लॅन कार्ड   सिडी रोम ड्राईव्ह 

 

ब्रॉडबँड सेवा सर्व प्रकारच्या {टेक्नॉलॉजी} एक्सचेंज व आरएसयू / आरडीएलयू एक्सचेंज मध्ये उपलब्ध होऊ शकते कां ?

एमटीएनएलच्या सर्व एक्सचेंजमध्ये ही सेवा उपलब्ध आहे. 

जर, स्वत:चे स्प्लिटर घेण्याची आमची इच्छा असेल तर, योग्य विक्रेतांची यासंबंधी माहीती द्या.

जर ग्राहक एमटीएनएल कडून सीपीई घेऊ इच्छित नसेल तर त्यांना स्वताचा सीपीई घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे.  एमटीएनएल ब्रॉडबँड कनेक्शनकरीता अनुरुप सीपीई सूची खालीलप्रमाणे आहे.

  • डी लिंक ५०२ टी
  • कॉमट्रेंड सीटी ५६४
  • वेस्टेल ए - ९०-३०१९९-०७
  • झायक्झेल प्रेस्टीज ६६० एच-६१
  • एरीक्सन एचएम ४१०सी 
  • क्सेवी { ७७२२ +}
  • स्टरलाईट ऑप्टिकल टेक्नॉलॉजीज लिमिटेड एसएएम-१०० 

ग्राहक कोणत्याही 'आयएसपी'चा 'ई-मेल' आयडी वापरू शकतो का ?

ग्राहक, कोणत्याही वेब आधारीत मेल सर्विसचा उपयोग करु शकतो.  परंतु एसएमटीपी सर्वरचा वापर संबंधित 'आयएसपी पॉलिसी'वर आधारीत आहे व ई-मेल सर्विस प्रदात्याकडून त्यांचे स्पष्टीकरण केले गेले पाहीजे.  

ब्रॉडबँड कनेक्शनवर स्टॅटिक आयपी उपलब्ध होऊ शकतो कां ?

हो, अधिक मूल्य देऊन स्टॅटिक आयपी मिळू शकतो.

इंटरनेटवर आईएसडी टेलिफोनि सुविधा उपलब्ध होऊ शकते कां ? जर होऊ शकत असेल तर कशा प्रकारे ?

हो, मल्टीमिडीया आधारीत, संगणकामध्ये एमटीएनएल 'बोल-अनमोल कॉलिंग कार्ड'च्या सहाय्याने इंटरनेटवरून आयएसडी टेलिफोनी शक्य होऊ शकते.

'डीआयडी/डीओडी लाईन्स'वर ब्रॉडबँड सेवा शक्य आहे का ?

एमटीएनएल वायर सेंटर कडून ब्रॉडबँड कनेक्शन संभव आहे.  जर डिआयडी/डिओडी लाईन्स ई-१ आधारावर सक्रिय केल्या गेल्या असतील तर कनेक्शन शक्य होऊ शकत नाही.

एडीएसएल ट्रायबँड खंडित झाल्यामुळे उर्वरित {ब्रोकन} डाऊनलोड पुन्हा प्राप्त करण्याकरीता एखादे उपकरण {टुल} उपलब्ध आहे का ?

हो॰ डाऊनलोड मॅनेजर नावचे, सॉफ्टवेअर उपलब्ध आहे,  ज्यामध्ये उर्वरित {ब्रोकन} डाऊनलोड पुन्हा प्राप्त करण्याची क्षमता आहे.  ह्या उपकरणामुळे कनेक्शन खंडित होण्यापूर्वीच्या उर्वरित डाऊनलोडला पुन्हा डाऊनलोड करता येत नाही.  तसेच अशा उपकरणांचा उपयोग करतांना, ग्राहकाची स्वत:ची जबाबदारी असेल॰ डाऊनलोड मॅनेजर संबंधी अधिक माहितीकरीता इथे क्लिक करा.

मी, एमटीएनएल ब्रॉडबँडच्या सहाय्याने, व्हीएसएनएल ईमेल आयडीचा उपयोग करुन मेल पाठवू शकतो कां ?

यामध्ये सध्या एमटीएनएल ब्रॉडबँड कनेक्शनवर एसएमटीपी सर्वर एक्सेस करण्यासाठी व्हीएसएनएलची मान्यता नाही.  ब्रॉडबँड कनेक्शन बरोबर एमटीएनएलचा ई-मेल आयडी विनामूल्य दिला जातो, ग्राहक त्याचा उपयोग करु शकतो. ग्राहक प्रति वर्ष फक्त रु. २०० देऊन अतिरिक्त ई-मेल आयडी घेऊ शकतात.

ई-मेल आयडीकरीता 'आऊटलूक एक्सप्रेस' कोणत्या पद्धतीने ' कॉन्फ़िगर केले जाते ?

आऊटलूक एक्सप्रेस कॉन्फ़िगर करण्यासाठी 'इंटरनेट एफएक्यू' पहा. ग्राहकांना एसएमटीपी व पीओपी ३ सर्वर संबंधी माहिती दिली जाऊ शकते॰ एसएमटीपी - smtp.mtnl.net.in, पोओपी ३ - pop.mtnl.net.in 

ईपीबीएक्सवर ब्रॉडबँड कनेक्शनचा उपयोग केला जाऊ शकतो कां ?

त्यासाठी ईपीबीएक्सची तेवढी क्षमता असणे आवश्यक आहे. ईपीएबीएक्स विक्रेत्या कडून 'ईपीएबीएक्स'च्या क्षमतेची तपासणी केली जाऊ शकते॰ 

ब्रॉडबँड कनेक्शनला एकापेक्षा अधिक संगणक जोडले जाऊ शकतात कां ? त्यासाठी कशाप्रकारे मूल्य आकारले जाते ?

ब्रॉडबँड कनेक्शनला एकापेक्षा अधिक संगणक जोडून आपले स्व:तचे 'नेटवर्क' स्थापित केले जाऊ शकते॰ अशा प्रकारात संपूर्ण नेटवर्कच्या 'डाऊनलोड' ची मोजणी केली जाते व नेटवर्कशी जोडलेल्या सर्व संगणकांमध्ये ब्रॉडबँडचा वेग {स्पीड} विभागला जातो॰   

आपल्या स्वत:च्या नेटवर्कमध्ये ब्रॉडबँड कनेक्शनचा उपयोग केला जाऊ शकतो का ?

  हो, तुम्ही तुमचे लॅन नेटवर्क निर्माण करण्याकरीता ब्रॉडबँड कनेक्शनचा उपयोग करु शकता॰     {silder एकाच वेळी फॅक्स व ब्रॉडबँड कनेक्शनचा उपयोग केला जाऊ शकतो का ? }   हो, तुम्ही फॅक्स व ब्रॉडबँडचा एकाच वेळी उपयोग करु शकता.  एमटीएनएल मॉडेम मधून बाहेर येणारी टेलिफोन लाईन इंटरनेट सर्फिंग व फॅक्स दोन्हीसाठी वापरता येते॰   
ब्राउजर विंडो मध्ये http://192168.1.1 हा युआरएल टाईप केल्यावर ही डी-लिंक राऊटरचे पेज का उघडत नाही ?

ब्राउजर विंडो मध्ये http://192168.1.1 हा युआरएल टाईप केल्यावर ही डी-लिंक राऊटरचे पेज का उघडत नाही ?

  कधीकधी असे होऊ शकते.  अशावेळी ग्राहकाने नेटवर्क सेटींगमध्ये "Obtain IP Address automaticaly " असा बदल करावा ज्यामुळे   पेज उघडण्यास मदत होईल.  

माझी टेलिफोन लाईन व संबंधित सर्व 'पॅरामीटर' व्यवस्थित आहेत तरीही मला इंटरनेट का कनेक्ट होत नाही ?

  कृपया, याबाबतीत ग्राहकने तक्रार नोंदविणे आवश्यक आहे व ग्राहकांना इंटरनेट न मिळण्याची बरीच कारणे असू शकतात. उदा ॰ -    'नॉक' येथे संपर्क साधुन पोर्ट टेस्ट करणे, डिएसलएएम {एरीया} मध्ये पोर्ट टेस्ट करणे॰    

राऊटर {एडिएसएल} लॅम्प स्थिर असतानांही ग्राहक इंटरनेट एक्सेस का करु शकत नाही ?

  जर, राऊटर लॅम्प स्थिर असेल व ग्राहकांना इंटरनेट मिळत नसेल तर राऊटर सेटींग तपासून पहाण्याची आवश्यकता आहे.  इंटरनेट सुरु करण्याकरीता राऊटरला पुन्हा कॉन्फिगर करावे॰    

पॉवर फेल्युअर असतानाही माझा दूरध्वनी कार्यरत राहू शकतो कां ?

  ग्राहकच्या परिसरात 'पॉवर फेल्युअर' असतानाही दूरध्वनी कार्यरत {ओके} राहू शकतो.   

ब्रॉडबँड व ट्रायबँड मध्ये काय फरक आहे ? ते, एडीएसएल पासून कसे वेगळे आहेत ?

  एमटीएनएल ब्रॉडबँड सेवेला 'ट्रायबँड' म्हणतात॰ ही सेवा जगातील अत्याधुनिक  अश्या 'एडीएसएल +२' तंत्रज्ञानावर आधारीत आहे.    { slider ब्रॉडबँड 'लॉग-ईन' करीता माझे युजरनेम व आयडी काय असेल ?}   तुमच्या ज्या दूरध्वनीवर ब्रॉडबँड कनेक्शन दिले आहे तो तुमचा लॉग-ईन आयडी असेल व एमटीएनएल कडून सांकेतिक शब्द {पासवर्ड} दिला जाईल जो तुम्ही नंतर बदलू शकता.  

मेल बॉक्स कसा बनवला जातो ?

  एमटीएनएलच्या संकेतस्थळाला भेट द्या॰ मेल बॉक्स तयार करण्यासाठी 'http://register.mtnl.net.in' ची मदत घ्या॰ तुमच्या 'युजर आयडी' व सांकेतिक शब्द {पासवर्ड} यांचा उपयोग करून तुम्ही स्वत: तुमचा विनामूल्य ई -मेल आयडी तयार करू शकता॰ त्याच प्रमाणे १८००२२८८४ वर 'मदत केंद्रा'शी {हेल्प डेस्क} संपर्क साधू शकता किंवा register@mtnl.net.in वर मेल पाठ वून मदत मागू शकता.  

जर ग्राहक, आमच्या कोणत्याही लँडलाईन प्लॅनचा उपयोग करु इच्छित नसेल तर ब्रॉडबँड वापरण्याकरीता किती मूल्य द्यावे लागेल

  केवळ एमटीएनएल लँडलाईन ग्राहकांकरीताच ब्रॉडबँड सेवा उपलब्ध आहे.

वाणिज्य विषयक

 

ब्रॉडबँड कनेक्शनकरीता कोठे अर्ज करावा लागतो ?

  संपर्क केंद्रासाठी {कॉलसेंटर} क्रमांक १५००       http://mtnlmumbai.in   एमटीएनएल ग्राहक सेवा केंद्र  

ही सेवा सुरु होण्ासठी किती वेळ लागतो ?

  ७ दिवसांच्या कालावधीत सेवा सुरु केली जाईल.  

ब्रॉडबँड कनेक्शनकरीता कोणत्या उपकरणांची आवश्यकता असते ?

  एमटीएनएल टेलिफोन लाईन सोबत एक एडीएसएल मॉडेम राऊटर {सीपीई} ची आवश्यकता असते.  ह्या सीपीईला स्प्लिटर असेही म्हटले जाते॰ प्रति महिना रु ५०/- या मूल्य आकारणीवर एमटीएनएल कडून सीपीई प्रदान केला जातो.  

जर ग्राहकाने वार्षिक मूल्य आकारणीचा पर्याय स्वीकारला तर विनामूल्य डाऊनलोडची मोजणी कशी केली जाईल व देयक आकारणी {बिलिंग} कशी केली जाईल ?

  वार्षिक मूल्य आकारणीचा {ऍन्यूअल सबस्क्रीप्शन} बाबतीत विनामूल्य डाऊनलोडची मोजणी मासिक स्वरूपात केली जाईल व ज्यात संबंधित महिन्याच्या 'बाकी डाऊनलोडला' पुढील महिन्याकरीता अग्रेषित केले जाणार नाही.  अधिक वापराकरीता देयक आकारणी {बिलिंग} मासिक स्वरूपात केले जाईल.  

इंटरनेटवर करण्यात येणारा अपलोड डाटा विनामूल्य असेल की त्याची मोजणी व मूल्य आकारणी केली जाईल ? उदा॰ ई-मेल पाठविणे, फाइल अटॅच करणे

  ग्राहकांच्या कोणत्याही प्रकारच्या अपलोडवर मूल्य आकारणी केली जाणार नाही॰ फाइल अपलोड, ई मेल पाठविणे इ॰ अपलोडचे प्रकार आहेत व त्यावर मूल्य आकारणी नाही॰    

सर्फिंग करीता कनेक्शनचा उपयोग केला गेल्यास प्रति तासाचे सरासरी डाऊनलोड डाटाचे प्रमाण काय असेल ?

  २५६ केबीपीएस गतीच्या कनेक्शनकरीता डाटा डाऊनलोड सरासरी प्रमाण प्रति  तासाला १०० एमबी असते.  

साईट्स सर्फिंगला डाऊनलोड मानले जाते कां ?

  हो, साईट्स सर्फिंग डाऊनलोड मानले जाते.    

जर एकाद्या महिन्यात विनामूल्य डाऊनलोडचा उपयोग केला गेला नाही तर त्या विनामूल्य डाऊनलोडचा पुढील महिन्यात उपयोग केला जाऊ शकतो कां ?

  विनामूल्य डाऊनलोडचा उपयोग त्याच महिन्यात करावा लागतो. पुढील महिन्यात त्याचा वापर करता येत नाही॰    

प्रति तास सरासरी डाऊनलोड एमबी युसेजचे प्रमाण काय आहे ? एमटीएनएलच्या सेवेचा उपयोग करतांना मला असे लक्षात आले कि उपयोग केला गेलेला 'युसेज', अन्य सेवा देणा-यांच्या तुलनेत अधिक दर्शविला जात आहे.

  प्रति तास डाऊनलोड एम बी चा अंदाज करणे कठीण आहे.  आम्ही २५६ केबीपीएस वेगाचे कनेक्शन देतो.  जेव्हा तुम्ही चित्रांसारखे {पिक्च र्स, इमेजेस इ॰} अधिक वेगाच्या डाटाचे सर्फिंग करता तेव्हा डाऊनलोड अधिक होते.  डाऊनलोड करणे पूर्णपणे ग्राहकांवर अवलंबून असते.  ग्राहक जे काही सारे पहातात ते सारे डाऊनलोड होत असते, जर ग्राहकांना हे जाणून घ्यायचे असेल की त्यांनी किती डाऊनलोड केले आहे तर एक तास सर्फिंग केल्यानंतर किती अधिक डाऊनलोड 'युसेज' केले आहे हे त्यांना तपासून पहाता येईल त्यामुळे त्यांना केलेल्या युसेज संबंधीची माहिती मिळेल.  

सायबर कॅफे अथवा पीसीओ धारक यांना हि सेवा मिळू शकते का ?

  हो, सायबर कॅफे अथवा पीसीओ धारक यांना हि सेवा मिळू शकते॰   

या सेवेच्या वापरकरत्याला {यूजर} त्याच्या यूसेज बद्दल माहिती मिळू शकते का ?

  http://register.mtnl.net.in या स्थला ला भेट देऊन ग्राहक त्याचा ब्रॉडबँड यूसेज पाहू शकतो॰    

ब्रॉडबँड सेवेसाठी सुरवातीची मूल्य आकारणी {उपफ्रंट पेमेंट} किती असेल ?

    एमटीएनएल लँडलाईनच्या विद्यमान ग्राहकासाठी {एक्झिस्टिंग कस्टमर} कोणतीही सुरवातीची मूल्य आकारणी {उपफ्रंट पेमेंट} नसेल॰    प्रत्येक मूल्य आकारणीचा समावेश ग्राहकाना दिलेल्या देयकात {बिल} असेल॰   

अतिरीक्त ई-मेल आयडीकरीता मूल्य किती असेल ?

  अरिरीक्त ई-मेल आयडीकरीता, प्रत्येक ४ एमबीच्या स्पेस बरोबर प्रति वर्ष रु. २०० मूल्य घेतले जाईल.  

जर मी, एमटीएनएल लँडलाईन घेऊ इच्छित नसेल तर मी ब्रॉडबँड कनेक्शन घेऊ शकतो कां ?

  तुम्हाला ब्रॉडबँड कनेक्शन घेण्याकरीता एमटीएनएल दूरध्वनी कनेक्शनची आवश्यकता आहे.  तसेच, एमटीएनएल कडून विनामूल्य लँडलाईन बरोबर आकर्षक कॉम्बो प्लान प्रदान केले जातात.  

ब्रॉडबँड कनेक्शनकरीता मला नविन दूरध्वनी कनेक्शनसाठी अर्ज करण्याची आवश्यकता आहे कां ?

  जर, तुमच्याकडे एमटीएनएल कनेक्शन असेल तर त्या दूरध्वनी कनेक्शन वर ब्रॉडबँड कनेक्शन दिले जाऊ शकते. त्यासाठी केवळ    ब्रॉडबँड सेवेकरिता अर्ज करावा लागतो॰ परंतु तुमच्याकडे एमटीएनएल दूरध्वनी कनेक्शन नसेल तर, तुम्हाला ब्रॉडबँड सेवेबरोबरच नवीन एमटीएनएल दूरध्वनी कनेक्शनसाठी अर्ज करावा लागेल॰     

माझ्याकडे एमटीएनलचा दूरध्वनी नाही आहे, ब्रॉडबँड कनेक्शनकरीता अर्ज कसा करावा ?

  जर, तुमच्याकडे एमटीएनएल कनेक्शन नसेल तर ब्रॉडबँड कनेक्शन एमटीएनएल दूरध्वनी कनेक्शन घेण्याकरीता अर्ज करावा लागेल.  

ब्रॉडबँड सेवेसंबंधी तक्रार करण्याकरीता हेल्पलाईन क्रमांक काय आहे ?

  ब्रॉडबँड सेवेच्या कोणत्याही चौकशीसाठी १५०० वर संपर्क करता येतो.  हेल्पडेस्ककरीता १५०० / १८०० २२८८४४ वर तुम्ही संपर्क साधू शकता.  

ग्राहकांनी कनेक्शन संबंधी समस्या किंवा सेवे संबंधी तक्रारींकरीता कोठे संपर्क करावा ?

  ग्राहक १९८ वर दोष नोंदणी {फॉल्टबुक} करु शकतात, ज्यामध्ये "xxxx"  एक्सचेंज लेव्हलशी संबंधित आहे.  

ब्रॉडबँड कनेक्शनच्या स्थानांतरणाकरीता किती मूल्य आकारले जाते ?

  हो, ग्राहकांकडून रु. १०० स्थानांतरण मूल्य घेतले जाते.  

डायल अप च्या बाबतीत इंटरनेट युसेजसाठी 'कॉल मूल्य' {कॉल चार्जेस} घेतला जातो कां ?

    केवळ डाटा डाऊनलोडकरीता मूल्य आकारले जाते॰    

ब्रॉडबँड सेवेच्या एका प्लॅनमधून दुस-या प्लॅनमध्ये जाण्याकरीता मूल्य आकारले जाते का?

    ब्रॉडबँड सेवेच्या एका प्लॅनमधून दुस-याप्लॅनमध्ये जाण्याकरीता मूल्य आकारले जात नाही॰  
 

दर्जा {क्वालिटि}

 

एमटीएनएल ब्रॉडबँड कनेक्शनचे कोणते फायदे आहेत ?

  एमटीएनएल ब्रॉडबँड होणारे मुख्य फायदे खालील प्रमाणे आहेत.   अत्यंत वेगवान कनेक्शन अर्थात, कमीतकमी २५६ केबीपीएसची समर्पित बँडविड्थ.   तुम्ही एकाचवेळी फोनवर बोलू शकता व इंटरनेट सर्फ करु शकता.   तुम्ही दुस-या कंप्युटर बरोबर कनेक्शन विभाजित करु शकता व नेटवर्क बनवू शकता॰     परवडणारी मूल्य आकारणी {टेरीफ प्लॅन}   सुरक्षित कनेक्शन   अखंडित इंटरनेट सेवा  

एमटीएनएल ब्रॉडबँड कनेक्शनवर दुस-या कोणत्या सेवा उपलब्ध आहेत ?

  एमटीएनएलकडून ट्रायबँड वर उपलब्ध करुन देण्यात येणा-या आकर्षक मूल्यवर्धित सेवा {व्हॅल्यु ऍडेड सर्विस} खालील प्रमाणे आहेत   आयपीटीव्ही   विडियो ऑन डिमांड   गेम्स ऑन डिमांड   पीसी प्रोटेक्शन   विओआयपी सर्विसेस  

ग्राहकांचे म्हणणे असे आहे की एमटीएनएल संकेत स्थळावर {वेब साईटवर} युसेज डाटा चुकीचा दर्शविला जातो.

  तुम्ही ग्राहकांना सांगू शकता की दर्शविली गेलेली बाकी राहीलेली एमबीची संख्या चुकीची असल्यास काळजी करु नका.  ग्राहकांचा प्लॅन व विनामूल्य  एमबीच्या अनुसार मूल्य आकारणी केली जाईल.  

अपलोड व डाऊनलोड वेग {स्पीड} समान असेल का ?

  एमटीएनएल ब्रॉडबँड द्वारा प्रस्तावित सर्व प्लॅनचा अपलोड वेग २५६ केबीपीएस आहे ग्राहक, रु.१५० प्रति २५६ केबीपीएसच्या दराने अतिरीक्त वेगची {स्पीड} निवड करु शकतात.  तसेच, तांत्रिक संभाव्यता अनुकूल असल्यास १ एमबीपीएस पर्यंतची अत्याधिक अपलोड गती प्रस्तावित आहे.  

केबल ब्रॉडबँडच्या तुलनेत एमटीएनएल ब्रॉडबँड कनेक्शन कसे उत्कृष्ट ठरते ?

  एमटीएनेल कडून समर्पित {डेडिकेटेड} ब्रॉडबँड कनेक्शन प्रदान केले जाते. परंतु केबल इंटरनेट हे समर्पित कनेक्शन नसते व एका पेक्षा अधिक युजर्स कडून त्याचे विभाजन होत असते॰