ब्रॉडबैंड चे वारंवार विचारले जाणारे प्रश्न {एफ ए क्यू}
तंत्रज्ञान विषयक{टेक्निकल}
ब्रॉडबँड कनेक्शनकरीता विद्यमान {एक्झिस्टिंग} मॉडेमचा उपयोग केला जाऊ शकतो कां ?
इंटरनेट करीता वापरले जाणारे बहुतांश मॉडेम डायल अप असतात. परंतु ते ब्रॉडबँड कनेक्शनसाठी उपयुक्त नाहीत. ब्रॉडबँड कनेक्शनकरीता विशिष्ट एडीएसएल मॉडेमची आवश्यकता असते. एमटीएनएलकडून हे मॉडेम दिले जाते व बाजारातूनही खरेदी केले जाऊ शकते. एमटीएनएलच्या संकेत स्थळावर संबंधित उपयुक्त मॉडेमची सूची उपलब्ध आहे.एडीएसएल मॉडेम कनेक्ट करण्यासाठी संगणकामध्ये {कंप्युटर} कोणत्या प्रकारच्या पोर्टची आवश्यकता असते ?
संगणकासोबतच्या जोडणी करीता एडीएसएल मॉडेम मध्ये इथरनेट पोर्ट किंवा युएसबी पोर्ट उपलब्ध असते. यातील एकाचा उपयोग कनेक्शनसाठी करता येतो. ब्रॉडबँड कनेक्शनच्या नोंदणीपूर्वी यातील कोणत्याही एका पोर्टच्या उपलब्धतेची खात्री करुन घ्यावी॰ब्रॉडबँड कनेक्शनचा उपयोग करतांसाठी कोणत्या संगणक प्रणालीची {कंप्युटर सिस्टिम} आवश्यकता असते ?
- ऑपरेटींग सिस्टीम विंडोज ९८ एसई व त्याहून उच्च दर्जाची अनुकूल पीसी हार्डवेअर रॅम १२८ व त्याहून अधिक वेगवान एडीएसएल मॉडेम/ राऊटरकरीता युएसबी पोर्ट किंवा लॅन कार्ड सिडी रोम ड्राईव्ह
ब्रॉडबँड सेवा सर्व प्रकारच्या {टेक्नॉलॉजी} एक्सचेंज व आरएसयू / आरडीएलयू एक्सचेंज मध्ये उपलब्ध होऊ शकते कां ?
एमटीएनएलच्या सर्व एक्सचेंजमध्ये ही सेवा उपलब्ध आहे.जर, स्वत:चे स्प्लिटर घेण्याची आमची इच्छा असेल तर, योग्य विक्रेतांची यासंबंधी माहीती द्या.
जर ग्राहक एमटीएनएल कडून सीपीई घेऊ इच्छित नसेल तर त्यांना स्वताचा सीपीई घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. एमटीएनएल ब्रॉडबँड कनेक्शनकरीता अनुरुप सीपीई सूची खालीलप्रमाणे आहे.- डी लिंक ५०२ टी
- कॉमट्रेंड सीटी ५६४
- वेस्टेल ए - ९०-३०१९९-०७
- झायक्झेल प्रेस्टीज ६६० एच-६१
- एरीक्सन एचएम ४१०सी
- क्सेवी { ७७२२ +}
- स्टरलाईट ऑप्टिकल टेक्नॉलॉजीज लिमिटेड एसएएम-१००
ग्राहक कोणत्याही 'आयएसपी'चा 'ई-मेल' आयडी वापरू शकतो का ?
ग्राहक, कोणत्याही वेब आधारीत मेल सर्विसचा उपयोग करु शकतो. परंतु एसएमटीपी सर्वरचा वापर संबंधित 'आयएसपी पॉलिसी'वर आधारीत आहे व ई-मेल सर्विस प्रदात्याकडून त्यांचे स्पष्टीकरण केले गेले पाहीजे.इंटरनेटवर आईएसडी टेलिफोनि सुविधा उपलब्ध होऊ शकते कां ? जर होऊ शकत असेल तर कशा प्रकारे ?
हो, मल्टीमिडीया आधारीत, संगणकामध्ये एमटीएनएल 'बोल-अनमोल कॉलिंग कार्ड'च्या सहाय्याने इंटरनेटवरून आयएसडी टेलिफोनी शक्य होऊ शकते.'डीआयडी/डीओडी लाईन्स'वर ब्रॉडबँड सेवा शक्य आहे का ?
एमटीएनएल वायर सेंटर कडून ब्रॉडबँड कनेक्शन संभव आहे. जर डिआयडी/डिओडी लाईन्स ई-१ आधारावर सक्रिय केल्या गेल्या असतील तर कनेक्शन शक्य होऊ शकत नाही.एडीएसएल ट्रायबँड खंडित झाल्यामुळे उर्वरित {ब्रोकन} डाऊनलोड पुन्हा प्राप्त करण्याकरीता एखादे उपकरण {टुल} उपलब्ध आहे का ?
हो॰ डाऊनलोड मॅनेजर नावचे, सॉफ्टवेअर उपलब्ध आहे, ज्यामध्ये उर्वरित {ब्रोकन} डाऊनलोड पुन्हा प्राप्त करण्याची क्षमता आहे. ह्या उपकरणामुळे कनेक्शन खंडित होण्यापूर्वीच्या उर्वरित डाऊनलोडला पुन्हा डाऊनलोड करता येत नाही. तसेच अशा उपकरणांचा उपयोग करतांना, ग्राहकाची स्वत:ची जबाबदारी असेल॰ डाऊनलोड मॅनेजर संबंधी अधिक माहितीकरीता इथे क्लिक करा.मी, एमटीएनएल ब्रॉडबँडच्या सहाय्याने, व्हीएसएनएल ईमेल आयडीचा उपयोग करुन मेल पाठवू शकतो कां ?
यामध्ये सध्या एमटीएनएल ब्रॉडबँड कनेक्शनवर एसएमटीपी सर्वर एक्सेस करण्यासाठी व्हीएसएनएलची मान्यता नाही. ब्रॉडबँड कनेक्शन बरोबर एमटीएनएलचा ई-मेल आयडी विनामूल्य दिला जातो, ग्राहक त्याचा उपयोग करु शकतो. ग्राहक प्रति वर्ष फक्त रु. २०० देऊन अतिरिक्त ई-मेल आयडी घेऊ शकतात.ई-मेल आयडीकरीता 'आऊटलूक एक्सप्रेस' कोणत्या पद्धतीने ' कॉन्फ़िगर केले जाते ?
आऊटलूक एक्सप्रेस कॉन्फ़िगर करण्यासाठी 'इंटरनेट एफएक्यू' पहा. ग्राहकांना एसएमटीपी व पीओपी ३ सर्वर संबंधी माहिती दिली जाऊ शकते॰ एसएमटीपी - smtp.mtnl.net.in, पोओपी ३ - pop.mtnl.net.inईपीबीएक्सवर ब्रॉडबँड कनेक्शनचा उपयोग केला जाऊ शकतो कां ?
त्यासाठी ईपीबीएक्सची तेवढी क्षमता असणे आवश्यक आहे. ईपीएबीएक्स विक्रेत्या कडून 'ईपीएबीएक्स'च्या क्षमतेची तपासणी केली जाऊ शकते॰ब्रॉडबँड कनेक्शनला एकापेक्षा अधिक संगणक जोडले जाऊ शकतात कां ? त्यासाठी कशाप्रकारे मूल्य आकारले जाते ?
ब्रॉडबँड कनेक्शनला एकापेक्षा अधिक संगणक जोडून आपले स्व:तचे 'नेटवर्क' स्थापित केले जाऊ शकते॰ अशा प्रकारात संपूर्ण नेटवर्कच्या 'डाऊनलोड' ची मोजणी केली जाते व नेटवर्कशी जोडलेल्या सर्व संगणकांमध्ये ब्रॉडबँडचा वेग {स्पीड} विभागला जातो॰
आपल्या स्वत:च्या नेटवर्कमध्ये ब्रॉडबँड कनेक्शनचा उपयोग केला जाऊ शकतो का ?
हो, तुम्ही तुमचे लॅन नेटवर्क निर्माण करण्याकरीता ब्रॉडबँड कनेक्शनचा उपयोग करु शकता॰ {silder एकाच वेळी फॅक्स व ब्रॉडबँड कनेक्शनचा उपयोग केला जाऊ शकतो का ? } हो, तुम्ही फॅक्स व ब्रॉडबँडचा एकाच वेळी उपयोग करु शकता. एमटीएनएल मॉडेम मधून बाहेर येणारी टेलिफोन लाईन इंटरनेट सर्फिंग व फॅक्स दोन्हीसाठी वापरता येते॰
ब्राउजर विंडो मध्ये http://192168.1.1 हा युआरएल टाईप केल्यावर ही डी-लिंक राऊटरचे पेज का उघडत नाही ?